TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

योगी आदित्यनाथांचा फतवाः आता शाळेत मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही

अलाहाबादः उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. योगी सरकारच्या निर्णयामुळे आता देशात नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने बदलला आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे.

तसंच ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमुद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचं सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळं करतं आहे. मात्र नुसतं इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसं विसरता येईल? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.

मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. 2020 मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. त्यानंतर योगींनी ट्विट करून म्हटले होते की, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतिकांना स्थान नाही. जय हिंद जय भारत.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button