breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

वंशभेदावर लस नाही, आता सर्वांनीमिळून ताे दूर करायला हवा : हॅरिस

अमेरिकेत डेमाेक्रॅटिक पार्टीने भारतवंशीय सिनेटर कमला हॅरिस यांच्या नावाची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घाेषणा केली. याबराेबर हॅरिस अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय व दक्षिण आशियाई वंशाच्या महिला ठरल्या आहेत. यानिमित्ताने हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे मूळ शहर विलमिंग्टन येथील एका हाॅटेलमधून भाषण दिले.

हॅरिस म्हणाल्या, ‘माझी आई १९ व्या वर्षी कर्कराेगाच्या उपचारासाठी भारतातून अमेरिकेत आली हाेती. त्यांची भेट कॅलिफाेर्निया विद्यापीठात माझ्या वडिलांशी झाली. तेव्हा ते अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी जमैकातून अमेरिकेत आले हाेते. म्हणूनच मी भारत व जमैकाहून अमेरिकेत आलेल्या लाेकांची मुलगी आहे. ट्रम्प यांच्यावर हॅरिस यांनी भाषणातून जाेरदार टीका केली. गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांनी देशात केवळ फूट पाडण्याचे प्रयत्न केले. ते देशाचे नेतृत्व करण्यात अयशस्वी ठरले. संपूर्ण देशात वंशभेदाच्या विराेधात आक्राेश आहे. परंतु वंशभेदावर लस उपलब्ध नाही. सर्वांनी मिळून हा राेग दूर करू. सर्वांची एकजूट घडवू .’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button