breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन स्वीय सहाय्यकांना रात्रीच अटक

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोघांना अटक करण्यात आली असून ई़डीने शुक्रवारी रात्री उशिराने या दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.

सचिन वाझेचाही तुरुंगातून जबाब

दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button