breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी कोरोनाकाळात योगाचा कशाप्रकारे फायदा झाला हे सांगितलं. तसेच कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दुनियातील बहुतेक देशांसाठी योग दिवस त्यांच्यासाठी जुनं सांस्कृतिक पर्व नाही. मात्र, कोरोना महामारीच्या इतक्या कठीण काळातही लोक योगाला विसरलेले नाहीत. उलट लोकांचा योगाबाबतचा उत्साह अधिक वाढला. याबाबतचं प्रेम अधिक वाढलं. या कठीण काळात योगानं लोकांना विश्वास दिला की आपण या महामारीसोबत लढू शकतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

योगामुळे शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही सकारात्मर परिणाम होतो. योगामुळे आपल्याला आपली विचारशक्ती समजते. योग आपल्याला निगेटिव्हीटीकडून क्रिएटिव्हीकडे घेऊन जातो, असं मोदींनी सांगितलं.

डॉक्टर आणि फ्रंटलाईन वर्करनंही योगाला आपलं सुरक्षाकवच बनवलं. योग आणि व्यायामामुळे चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. चांगलं आरोग्यच सर्व यशाचं माध्यम असल्याचं मोदी म्हणाले. तसेच मोदींनी यावेळी योगाच्या नव्या अॅपची घोषणाही केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button