breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

 ‘मंथन’मुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला ‘ऊर्जा’!

  • शिर्डीतील शिबिराला प्रमुखांची उपस्थिती : आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचा निर्धार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी मंथन शिबिरात सहभागी झाले. पक्षाचा संघटनात्मक कार्यक्रम असला तरी, या शिबिरामुळे  सकारात्मक ‘ऊर्जा’ मिळाली आहे, असा दावा केला जात आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यस्तरीय मंथन शिबीर झाले. संपूर्ण राज्यातून पदाधिकाऱ्यांनी शिबिराला उपस्थिती दर्शवली.  पक्षाचे सर्वेसर्वा दस्तुरखुद्द शरद पवार रुग्णालयत उपचार घेत असतना थेट शिबिरासाठी उपस्थित राहीले. पक्षाची ध्येय-धोरणे आणि आव्हाणे यावर सकारात्मक ‘मंथन’ झाले. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनीही शिबिरात सहभाग नोंदवला.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर म्हणून २०१९ नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची रिघ लागली होती. शहरात झालेल्या कार्यक्रमांना हवशे-गवशे आणि नवशे अशी मोठी गर्दी पहायला मिळत होती. मात्र, शिंदे-फडवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीची ‘गर्दी’ ओसरलेली पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील २० ते २५ निवडक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाकडून आलेल्या कार्यक्रमात सहभागी होत पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत साथ देण्याचा निर्धार केला आहे.

कार्यक्रमाला यांची उपस्थिती…
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी- चिंचवड निवडणूक प्रभारी योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष श्याम लांडे, राहुल भोसले,  निलेश पांढरकर, पंकज पालेकर, मयूर कलाटे,  प्रशांत शितोळे फजल शेख माझी महापौर मंगलाताई कदम माजी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर नगरसेवक विक्रांत लांडे पंकज भालेकर विनोद नढे राष्ट्रवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहर खजिनदार दीपक साकोरे यांच्यासह वीस ते पंचवीस प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी येथील मंथन शिबिरासाठी राज्यभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यातून थेट शिबीर स्थळी येत आदरणीय पवार साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड मोठी ऊर्जा दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन दिवशीय शिबीर खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या उपस्थितीमुळे यशस्वी झाले आहे. साहेबांचा हा उस्फुर्त उत्साह कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी मोठे बळ देणारा ठरणार आहे.

– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button