breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी लायक नसेल तर सांगा’, आमदार संजय शिरसाठांनी अडीच पानांचं पत्र लिहिलं!

मुंबई : शिवसेनेचे जवळपास ३० ते ३५ आमदार फुटल्यानंतर आणि भावनिक आवाहन करुनही एकनाथ शिंदे मानायला तयार नाहीयेत, हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे येत काल महाराष्ट्राला संबोधित केलं. मी मुख्यमंत्रिपदाला लायक नसेल तर सांगा, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझं काय चुकलं हे सांगा, मी आता राजीनामा द्यायला तयार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं. त्यांचं भावनिक भाषण होऊन १८ तास उलटल्यानंतर शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी या पत्रातून उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं, त्यांनी अडीच वर्षाच्या काळात कोणत्या चुका केल्या, याचा पाढाच पत्रातून वाचला आहे.

मुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून आपण आम्हाला भेटत नव्हता, आपण आम्हाला वेळ देत नव्हतात, ही सगळ्यात मोठी खंत या पत्राच्या माध्यमातून संजय शिरसाट यांनी मांडली आहे. दुसरी मोठी खंत आहे ती म्हणजे निधीची… काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधी मिळत होता, त्यांच्या उद्घाटनांचे समारंभ सुरु होते, त्याचे फोटो आम्ही सोशल मीडियावर पाहायचो. पण आमचा मुख्यमंत्री असूनही आम्हा भेट मिळत नव्हती आणि निधीही मिळत नव्हता, असं संजय शिरसाठ यांनी पत्रात म्हटलंय. तिसरा प्रमुख मुद्दा म्हणजे-मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, अशी टीका कालपर्यंत भाजप नेते करायचे. आज मात्र शिवसेनेच्या आमदाराने भाजप नेत्यांपेक्षाही अंगावर जाणारी टीका केली आहे. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळयाचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केलाय.

आमदार म्हणून वर्षा किंवा मातोश्री बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूना असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणान्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. एकंदर संजय शिरसाठ यांनी लिहिलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात काय काय चुका केल्या, हेच दाखवण्याचा प्रयत्न या पत्रातून केला गेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अॅक्शनला शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांची रिअॅक्शन मानली जातीये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button