breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Yashomati Thakur : सारी दुनिया का बोझ हम उठाते है; महिला बालविकास मंत्री भावूक!

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर सऱ्हास दिसणारे ‘कुली’ हे अत्यंत मेहनती आणि प्रवशांचा भार उचलणारे संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. अनेक चित्रपटांमध्ये कुलींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला आहे. या कुलींच्या जीवनाबाबत प्रत्येकाला कुतुहल असते…राज्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकुर यांनीही कुलींबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. इतकेच नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे कुलींशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या आहेत.

सोशल मीडियावर मंत्री यशोमती ठाकूर यांची पोस्ट व्‍हायरल होत आहे. त्यामध्ये ठाकुर यांनी म्हटले आहे की, गेली दहा वर्षं झालीत,आमदार म्हणून मुंबईच नव्हे तर,पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, रेल्वेने सतत प्रवास करावा लागला. पण ज्या,ज्या वेळी रेल्वे स्टेशनवर गेले,की प्रवाश्यासोबतच ” लक्ष वेधुन “घ्यायचे ते कुली,एका विशिष्ट “वेशभूषेत” कायम प्रवाशांच्या “बॅग व इतर”साहित्याचं सतत “ओझं” वाहणारे हे कुली,त्यांचं आयुष्य,त्यांचं जगणं या बाबत कुतूहल वाटायचं.पण त्यांच्याशी “कधी संवाद साधण्याचा”प्रसंग आलाच नाही.मंत्री म्हणून कार्यरत असले तरी,काल (२८ फेब्रुवारी)अमरावतीच्या परतीच्या प्रवासासाठी “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स रेल्वे स्टेशनवर” आले, अन परत ते कुली दिसले,अन त्याच क्षणी त्यांच्याशी संवाद साधला.या निमित्याने त्यांचं विश्व,त्यांचा जगण्याचा संघर्ष अशा अनेक,गोष्टींचा पट अलगद उलगडत गेला.शेवटी ती पण माणसंच आहेत,हा एकच विचार ” होता बस्स इतकंच!

दरम्यान, मंत्री यशोमती ठाकुर यांच्या संवेदनशीलपणाचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button