पुनावळेत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजन

पिंपरी : फार्मसिस्ट हे आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे रुग्णांना योग्य औषधे आणि मार्गदर्शन मिळते. त्यांच्या तज्ज्ञता आणि समर्पणाची मोलाची ओळख विश्व फार्मसिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. जो प्रतिवर्षी २५ सप्टेंबरला साजरा केला जातो. जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनच्यावतीने शहरातील सर्व विभागातील फार्मसिस्ट आणि औषध विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
पुनावळे येथील लोट्स बिझनेस स्कूल या शाळेत पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विभागात कार्य करणारे फार्मसिस्ट आणि औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सूरज पांढरे, गणेश जाधव, प्रवीण गांगर्डे, दिनेश सोलंके, माऊली लेंगारे व ऋषिकेश चव्हाण यांनी केले होते.