breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंडन केल्याने शिवसेना कार्यकर्तीचा संसार उध्दवस्त

बीड – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सर्वच स्तरातून आंदोलने करण्यात येत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. बीडमधील शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कर्जमाफीसाठी या महिलांनी मुंडन आंदोलन केले. यामध्ये या महिलांनी प्रत्यक्षात मुंडन केल्याने त्यांच्यावर कुटुंबिय आणि इतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अशाप्रकारे केस कापल्यामुळे महिलांना अतिशय वाईट वागणूक द्यायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी सध्या या कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत.

स्वाती जाधव या शिवसेनेच्या या कर्जमाफी आंदोलनाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून ओळखल्या जातात. टीव्ही ९ या वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी या आंदोलनात मुंडन केल्याने जाधव यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. यांना पतीने घरातून हाकलून दिले, तर कुटुंबातील इतर मंडळींनी त्यांना वाळीत टाकले आहे. त्यामुळे हे आंदोलन त्यांचा संसार उध्वस्त करायला कारणीभूत ठरले आहे. आता पक्षाच्या आंदोलनामुळे घराबाहेर पडण्याची वेळ आल्यावर पक्ष त्यांच्याकडे लक्ष देईल असे वाटले होते. मात्र तसे न होता पक्षानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोटापाण्यासाठी काहीतरी करायला हवे यासाठी स्वाती जाधव यांनी अहमदनगर गाठले. माहेरच्या मंडळींकडेही त्यांना प्रवेश नसल्याने त्या एका वडापावच्या गाडीवर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत इतरही काही महिलांवर अशीच वेळ आली आहे.

या आंदोलनाला आता दिड वर्ष झाले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या आंदोलनाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र या महिलांवर घराबाहेर पडण्याची वेळ आली असताना मात्र त्यांचे किंवा पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचे मात्र त्याकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे अशी परिस्थिती आली असताना शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही या महिलांची चेष्टा केली जात आहे. त्यामुळे पक्षासाठी आंदोलन केले आणि संसार आणि जीवन उध्वस्त झाले अशीच या महिलांची अवस्था झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button