क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा विजयारंभ!

माऊंट माँगानुई |  जेतेपदाचा दावेदार भारतीय संघाने रविवारी महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. सलामीवीर स्मृती मानधना, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांच्या अर्धशतकांनंतर डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारताने सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०७ धावांनी धुव्वा उडवला.

माऊंट माँगानुई येथील बे ओव्हलवर झालेल्या या सामन्यात भारताने केलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १३७ धावांतच गारद झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानवरील हा भारतीय महिला संघाचा सलग ११वा विजय ठरला. आता भारताचा पुढील साखळी सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध १० मार्चला (गुरुवार) रंगणार आहे.

तत्पूर्वी, रविवारी झालेल्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची युवा सलामीवीर शफाली वर्मा खातेही न उघडता बाद झाली. मानधना (७५ चेंडूंत ५२ धावा) आणि दीप्ती शर्मा (५७ चेंडूंत ४०) या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले. मात्र, या दोघींसह कर्णधार मिताली राज (९), हरमनप्रीत कौर (५) आणि रिचा घोष (१) झटपट माघारी परतल्याने भारताची २ बाद ९६ वरून ६ बाद ११४ अशी स्थिती झाली. मग २२ वर्षीय वस्त्राकर (५९ चेंडूंत ६७) आणि राणा (४८ चेंडूंत नाबाद ५३) यांनी ११२ धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. ही महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सातव्या गडय़ासाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २४४ अशी धावसंख्या उभारली.

२४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीर सिद्रा अमीन (३०) आणि जवेरिया खान (११) यांनी सावध सुरुवात केली. मात्र, ११व्या षटकात गायकवाडने जवेरियाला माघारी पाठवले आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. गायकवाड (४/३१), राणा (२/२७) आणि दीप्ती (१/३१) या फिरकी त्रिकुटापुढे पाकिस्तानच्या मधल्या फळीचा निभाव लागला नाही. ३९ वर्षीय झुलन गोस्वामी (२/२६) आणि मेघना सिंग (१/२१) यांनीही टिच्चून मारा केल्याने पाकिस्तानचा डाव ४३ षटकांत १३७ धावांत आटोपला. दुखापत झाल्यामुळे पूजाने क्षेत्ररक्षण केले नाही. परंतु तिनेच सामनावीर पुरस्कार पटकावला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ७ बाद २४४ (पूजा वस्त्राकर ६७, स्नेह राणा नाबाद ५३, स्मृती मानधना ५२; नशरा संधू २/३६) विजयी वि. पाकिस्तान : ४३ षटकांत सर्वबाद १३७ (सिद्रा अमीन ३०, डायना बेग २४; राजेश्वरी गायकवाड ४/३१, झुलन गोस्वामी २/२६)

’ सामनावीर : पूजा वस्त्राकर

मितालीचा अनोखा विक्रम

भारताची कर्णधार मिताली राजने रविवारी अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. यंदा मिताली तिच्या सहाव्या एकदिवसीय विश्वचषकात खेळत असून ही कामगिरी करणारी ती पहिली महिला, तर सचिन तेंडुलकर आणि जावेद मियांदाद यांच्यानंतरची एकूण तिसरी क्रिकेटपटू ठरली आहे. ३९ वर्षीय मितालीने याआधी २०००, २००५, २००९, २०१३ आणि २०१७च्या विश्वचषकांत भारताचे प्रतिनिधित्व केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button