क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच ; निवासस्थानाच्या तपासणीदरम्यान खोलीत रक्ताचे डाग सापडल्याची थायलंड पोलिसांची माहिती

कोह सामुई  | ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न थायलंड येथे काही मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. तेथेच शुक्रवारी त्याचे निधन झाले. त्यानंतर कोह सामुई येथील निवासस्थानाची तपासणी केली असता थालयंड पोलिसांना त्याच्या खोलीतील फरशी, तसेच आंघोळीच्या टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले. मात्र यामध्ये काहीही संशयास्पद नसून वॉर्नचा मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे, असे समजते.

‘‘आम्हाला वॉर्नच्या खोलीत मोठय़ा प्रमाणात रक्त आढळले आहे,’’ असे स्थानिक प्रांतीय पोलिसांचे प्रमुख सतित पोल्पिनित यांनी थायलंडमधील प्रसारमाध्यमांना सांगितले. वॉर्नने काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांकडून हृदयाची तपासणी करून घेतली होती, असे कोह सामुई येथील बो फुट पोलीस स्थानकाचे अधीक्षक युत्ताना सिरीसोम्बे यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे वॉर्नचा मृत्यू संशयास्पद होता, असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, वॉर्नच्या एका मित्राला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी रुग्णवाहिका बोलावली आणि दरम्यानच्या कालावधीत त्यांनी वॉर्नला ‘सीपीआर’ दिला. मात्र, ते वॉर्नचा जीव वाचवू शकले नाहीत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वॉर्नवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने स्पष्ट केले आहे. ‘‘मी वॉर्नच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असून त्यांनी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे खेळ, व्हिक्टोरिया राज्य आणि ऑस्ट्रेलियासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या वॉर्नला आदरांजली वाहण्याची व्हिक्टोरियातील नागरिकांना संधी मिळेल,’’ असे ऑस्ट्रेलियन खासदार डॅनियल अँड्रय़ू यांनी रविवारी ‘ट्वीट’ केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button