breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

सेवा विकास बँकेचा ४०० कोटींचा घोटाळा ः पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी

पिंपरी चिंचवड, पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्यांशी संबंधित काही ठिकाणांवर ईडीचे पथक कारवाई करत आहे.

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.

यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळे उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

नुकतेच आले होते जामिनावर बाहेर
अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.

आयुक्त कृष्ण प्रकाश आले होते अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे सेवा विकास बँक प्रकरणात अडचणीत आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यात सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात संचालकांना अटक करण्याचे आदेश असताना त्यांनी अटक केली नाही. त्यासाठी त्यांनी साडेतीन कोटी रुपये घेतले होते, असा आरोप करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button