TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमुंबई

निगडी येथे महिला शौर्य प्रशिक्षण ‘हर घर दुर्गा’ अभियान उत्साहात

पिंपरी : भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी आयोजित महिला शौर्य प्रशिक्षण ‘हर घर दुर्गा अभियान’ उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका शैलजा सांगळे, प्रा. उत्तम केंदळे (माजी नगरसेवक) व उद्घाटक कमलताई घोलप (माजी नगरसेविका पिंपरी- चिंचवड महानगरपालिका) प्रशिक्षक विजय तेपुगडेसर (सीलंबम आंतरराष्ट्रीय विजेते) विनिता गिरी आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका शैलजाताई सांगळे यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले. कमल घोलप यांनी यमुनानगर आणि आपल्या परिसरातील सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन केले आणि आयोजकांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षक विजय सरांनी लाठी काटी सीलबम याचे प्रात्यक्षिक घेतले व शिबिरार्थींना स्व संरक्षणाचे धडे दिले.

या प्रसंगी नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी, शरद इनामदार, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख व मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे, मीनल शुक्ल, प्रिया देशमुख, शर्वरी येरगट्टीकर, सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button