breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘यात्रा करा, गौतमी पाटील बघा पण आधी मतदान करा’; अजित पवारांचा मिश्कील सल्ला

मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात. दरम्यान, अजित पवार यांनी मतदान करण्यावरून मिश्किल टिप्पणी केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशा मिश्किल शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले.

माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की..माझ्यामागे का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचे? मी असं का बोललो, असं विचारले जाते. मी मला येतं ते बोलतो. लोकांना असा वाटतं की २०१९ ला जसं केलं, तसंच जातो की काय. पण मी आज तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार आहे, असा पुनरूच्चार अजित पवारांनी केला.

मी विशिष्ट नेत्यांच्या बाबतीत सॉफ्ट आहे, असं बोललं जातो. पवार साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याचे काम करतो आहे. एखाद्या माझ्या विचाराचा नसेल तर त्याच्या गचुद्याला पकडू का? अनेक राज्यात विधान भवनात हाणामारी होते. मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. कंगना राणावतचा सिनेमा आहे. तुम्हाला वाटेल याला कसं माहिती कंगना राणावत. तुम्हाला जसे सिनेमा पाहावा असे वाटते तसे मला देखील पाहावं वाटतं, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button