breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्याही वर, पण ‘या’ राज्यात आत्ता आढळला पहिला रुग्ण

देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या एक लाख ३१ हजार ८६८ इतकी झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यात करोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. देशातील करोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या सिक्कीम राज्यात शनिवारी करोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे.

सिक्किममधील एका वरिष्ठ आधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, २३ मे रोजी सिक्कीममध्ये करोना बाधित रूग्ण आढळला आहे. राज्यातील हा पहिलाच रूग्ण आहे. दिल्लीहून परतणाऱ्या २५ वर्षीय तरूणाला करोनाचा संसर्ग झाला झाला आहे. आरोग्य विभागाचे सह सचिव पेम्पा शेरिंग भूटिया यांनी पत्रकारांना सांगितले की, २५ वर्षीय विद्यार्थाचे नमुने तपासणीसाठी सिलिगुडी येथील उत्तर बंगाल चिकित्सा महाविद्यालयात पाठवण्यात आले. शनिवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर करोना झाल्याचं स्पष्ट झालं.

भूटिया म्हणाले की, विद्यार्थी दक्षिण सिक्कीममधील रबांग्लाचा असून त्याच्यावर सर थूतोब नामग्याल स्मारक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ वर्षीय तरूण दिल्लीमध्ये स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होता. गेल्या आठवड्यात खासगी बसने तो सिलिगुडीला आला होता. १९ मे रोजी त्याच्यामध्ये करोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याला करोना झाल्याचे समोर आले.

दरम्यान, मागील चोवीस तासांत देशभरात सहा हजार ७६७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख ३१ हजार ८६८ वर पोहचली आहे. ५४ हजार ४४० जणांनी करोनावर मात केली आहे. तर तीन हजार ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात ७३ हजार ५६० जणांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button