ताज्या घडामोडीमुंबई

माथेरानमध्ये शिरच्छेद करून महिलेची निर्घुण हत्या

माथेरान | मुंबईनजीक असलेले थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरान येथे एका महिलेचा शिरच्छेद करून निर्घुण हत्या करण्यात आली असून तिचे शिरही गायब आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण माथेरान शहर हादरले आहे. या घटनेमुळे माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सध्या हिवाळा असल्याने थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान माथेरानच्या इंदिरा नगर मध्ये असलेल्या एका खाजगी लॉजमध्ये शनिवारी एक जोडपे येवून राहिले होते. यातील तरुणाचे नाव अमजद खान आणि तरुणीचे नाव रुबिना बेन असे सांगण्यात आले होते. लॉजच्या नोंदणी बुकात तशी त्यांची नोंद आहे . दरम्यान आज सकाळी ११ च्या सुमारास त्या लोज मध्ये रुबिना बेन हिचा विवस्त्र अवस्थेत शीर नसलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून शीर नसलेला महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. तर चौकशीत या महिलेसोबत असलेला अमजद खान गायब असल्याने प्रथमदर्शनी पोलिसांना या हत्येमागे त्याचाच संशय आहे. त्याच बरोबर लॉजवर रूम बुक करताना त्यांनी नोंदवलेली नावेही खरी नसावीत, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान महिलेचे शीर गायब असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांना काहीसे कठीण असल्याचे समजते तर या घटनेमुळे पुन्हा एकदा माथेरानसारख्या पर्यटन स्थळी प्रेमी युगुलान बेकायदेशीरपणे रूम भाड्याने देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या हत्येप्रकरणी माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button