breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमचे डाॅ. विनायक पाटील यांचे सेवानिलंबन रद्द ; आयुक्तांची भूमिका संशयास्पद?

  • डाॅक्टरांचे सेवानिलंबन कारवाई मागे, खातेनिहाय चाैकशी सुरुच राहणार   

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील वायसीएमचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनायक पाटील यांच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे डाॅ. पाटील यांच्यावर 14 फेब्रुवारीला सेवानिलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतू, आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी डाॅक्टरांची अपुरी संख्या आणि रुग्णांमध्ये निरंतर होणारी वाढ विचारात घेवून डाॅ. पाटील यांच्यावरील सेवानिलंबन रद्द करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर याची भूमिका संशयास्पद दिसत आहे.  

निगडी पोलिस ठाण्यात एका महिलेने महापालिकेच्या ‘वायसीएम’ रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनायक पाटील यांच्यावर विनयभंगाची तक्रार दिली. त्या तक्रारीमुळे डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

यासंर्दभात डाॅ. विनायक पाटील हे महापालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना गैरवर्तन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांना 19 नोव्हेंबर 2018 रोजी अटकेची कारवाई झाली. त्यांना अटक केल्याचा अहवाल विशेष कार्य अधिकारी तथा अधिष्ठाता वायसीएम रुग्णालयांनी 21 डिसेंबर 2018 रोजी सादर केला होता. त्यामुळे डाॅ. विनायक पाटील यांनी शासकीय कर्मचा-याला अशोभनीय असे गुन्हेगारीचे गैरवर्तन करुन जनमाणसात महापालिकेची प्रतिमा मलिन केलेली आहे. याप्रकरणी डाॅ. पाटील यांच्या अटकेच्या दिनाकापासून सेवानिलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, महापालिकेत पारदर्शक व शाश्वत विकासाच्या गप्पा मारणारे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी स्वता:चाच  घेतलेला निर्णय बदलला आहे. त्यांनी डाॅ. विनायक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सेवानिलंबनाची कारवाई केली होती. परंतू, आयुक्तांनी त्याचे सेवानिलंबन रद्द केले आहे. हे सेवानिलंबन रद्द करताना त्यांनी वायसीएम रुग्णालयात डाॅक्टरची असणारी कमतरता आणि नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत, म्हणून डाॅ. पाटील यांच्या यापुर्वीच्या सेवेचा विचार करता त्यांचे सेवानिलबंन रद्द केले आहे.  तसेच डाॅ. पाटील यांच्यावरील फाैजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयाच्या अधिन राहून  महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1978 च्या नियम 8 नूसार खातेनिहाय चाैकशी पुढे सुरु ठेवण्याचे आदेश आयुक्त हर्डिकर यांनी दिले आहे. याशिवाय डाॅ. पाटील यांनी पुर्ववत वैद्यकीय अधिकारी पदावर तात्काळ रुजू व्हावे, असा आदेश दिला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button