breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोयता हातात घेऊन फोटो काढणाऱ्या ‘भाई’ ला पोलिसांसमोर जोडावे लागले हात

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून दहशत पसरविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली आहे. आरोपीने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट केला होता. अशा गुन्हेगारांवर गुंडा विरोधी पथक आणि सायबर सेलचे बारीक लक्ष आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड असं आरोपीचे नाव असून तो रावण साम्राज्य टोळीच्या नावाचा वापर करून परिसरात दहशत पसरवत होता. अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, अशा प्रकारे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यास महागात पडू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवर हातात कोयता घेऊन फोटो पोस्ट करणे आरोपी स्वप्नील गायकवाडला महागात पडलं आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अक्षरशः स्वतः ला भाई म्हणावणाऱ्या स्वप्नीलला अखेर हात जोडावे लागले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button