breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

अपक्ष उमेदवार निता ढमालेंना अवघी 532 मते, आमदार अण्णा बनसोडे यांना ‘धक्का’

  • पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी नाकारले
  • ढमाले यांचा परभाव लागला आमदार बनसोडे यांच्या जिव्हारी

पिंपरी / महाईन्यूज

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी डावलली असताना गुडघ्याला बाशिंग बांधून लढलेल्या आमदार अण्णा बनसोडे यांच्या समर्थक अपक्ष उमेदवार निता ढमाले यांना अवघी 532 मते पडली. पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढल्याने पिंपरी-चिंचवडमधील सुजान मतदारांनी ढमाले यांना स्पष्टपणे नाकारले. ढमाले यांचा परभाव हा आमदार बनसोडे यांना एकप्रकारे धक्का मानला जात आहे.

निता ढमाले या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्या त्या समर्थक मानल्या जातात. पदवीधरच्या पुणे मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांनी सुरूवातीपासूनच क्लेम केला होता. त्यासाठी आमदार बनसोडे यांनी व्युवरचना तयार करून दिली. मात्र, राष्ट्रवादीने ढमाले यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. दरम्यान, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. त्यावेळी शहराध्यक्ष वाघेरे-पाटील आणि आमदार बनसोडे यांनी घाईघाईत ढमाले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना बनसोडे यांच्या इच्छेखातर वाघेरे-पाटीलांना त्याठिकाणी उपस्थित रहावे लागले. वाघेरे-पाटील आणि आमदार बनसोडे यांच्या उपस्थितीत ढमाले यांचा अपक्ष अर्ज भरतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. दोघांची पक्षविरोधी भूमिका निदर्शनास आल्याने पक्षाचे कारभारी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत निवडणूकपूर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोघांची चांगलीच खरडपट्टी काढली.

या निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाढ यांची घोषणा झाल्यानंतर सुध्दा ढमाले यांनी आपल्या प्रचाराची गती कायम ठेवली. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाकडून वाघेरे-पाटील आणि आमदार बनसोडे यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. शेवटी या निवडणुकीत अरुण लाढ यांचा 1 लाख 22 हजार 145 मतांनी विजय झाला. तर, आमदार बनसोडे यांच्या समर्थक ढमाले यांना अवघी 532 मते पडली. पिंपरी-चिंचवडमधील 50 टक्के मतदान मिळवू न शकलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे पक्षाचा अवमान केल्यासारखे आहे. याचा वाघेरे आणि बनसोडे यांच्या राजकीय भवितव्यावर निश्चितच परिणाम पडणार आहे, असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील जाणकार व्यक्तींनी दिले आहेत.

पुणेकर मतदारांची राष्ट्रवादीला साथ

राज्यात सहा मतदार संघामधील शिक्षक आणि पदवीधर मतदार निवडणुका झाल्या. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.  पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवे लागले आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्त्व नाकारले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button