breaking-newsआंतरराष्टीय

WHOनं सांगितलं नवं औषध

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला.

वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला. 

ऑक्सफर्ड विद्यापीठातून करण्यात आलेल्या संशोधनामध्ये dexamethasone हे औषध काही ठराविक मात्रेमध्ये विविध प्रकारच्या ऍलर्जी, अस्थमा (दमा),  काही प्रकारचे कॅन्सर अशा रोगांवर वापरलं जातं. याच औषधावर जवळपास १० दिवस संशोधन केल्यानंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या कोविड रुग्णाला वाचवता येऊ शकतं असं सिद्ध झालं आहे. 

सध्याच्या घडीला हे निष्कर्ष प्राथमिक स्वरुपाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध होणं प्रतिक्षेत आहे. पण, निकालस्वरुपी हाती आलेले निष्कर्ष हे सकारात्मक असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button