पिंपरी / चिंचवड

बैलगाडा शर्यत पाहताना चुकून खडा लागला : 20 जणांनी केली दोघांना बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

च-होली बुद्रुक येथे बैलगाडा शर्यत पाहताना एका तरुणाने मित्राला खडा मारला. तो चुकून एका व्यक्तीला लागला. याबाबत तरुणाने माफी मागितली. मात्र खडा लागलेल्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांना बोलावून दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी पाच वाजता घडली.

अक्षय पठारे, हर्षल पठारे, अक्षय तापकीर, सोन्या पठारे, गुड्ड्या बुर्डे, विशाल पठारे, काल्या, दिघ्या व 10 ते 12 इसम (सर्व रा. च-होली बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज मधुकर मगर (वय 26, रा. च-होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज आणि त्यांचे दाजी दीपक शिंदे शनिवारी च-होली बुद्रुक येथील बैलगाडा शर्यत घाटात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. शर्यत पाहत असताना मनोज यांनी त्यांचा मित्र नेताजी लटोरे याला खडा मारला. मात्र तो खडा चुकून आरोपी अक्षय पठारे याला लागला. याचा अक्षय पठारे याने मनोज यांना जाब विचारला. त्यावर मनोज यांनी खडा चुकून लागला असल्याचे सांगत माफी मागितली.

त्यानंतर अक्षय पठारे याने मनोज यांच्यासोबत वाद घालून मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मनोज यांचे दाजी दीपक शिंदे आले असता आरोपी अन्य आरोपींना बोलावून शिवीगाळ केली. तसेच मनोज आणि दीपक शिंदे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी आरोपींनी मारहाण केली. आरोपी हर्षल पठारे आणि अक्षय तापकीर यांनी दीपक शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. गुड्ड्या आणि विशाल यांनी फिर्यादीच्या पाठीत दगड मारून जखमी केले. सोन्या पठारे याने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button