पिंपरी / चिंचवड
भर दिवसा रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपी अटकेत
पिंपरी l प्रतिनिधी
बाजारात घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजता चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.
कुलदीपसिंग लखनसिंग ताक (वय 19, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 14 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बाजार घेऊन घरी जात होती. त्यावेळी आरोपीने मुलीचा पाठलाग करून रस्त्यात अडवले. ‘तुला लय मस्ती आली आहे का. मी तुला लाईक करतो’ असे म्हणून मुलीसोबत गैरवर्तन करत आरोपीने मुलीचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.