breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारणविदर्भ

आपण कोणत्या पक्षाचे…मनोज जरांगे पाटील स्पष्ट बोलले

जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी आपण कोणत्या पक्षाचे आहोत, यावरुन आरोप केले जात आहे. मी आताच सांगतो, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी कोणत्याही पक्षाचे काम करत नाही. मी समाजाचा आहे. समाज माझ्यासाठी देव आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचेही काही चालत नाही.  अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना आपण कोणत्याही पक्षाचे नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासंदर्भात सर्व काही देवेंद्र फडवणीस करत आहे. अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही लोक हे काम करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत. मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या.

हेही वाचा – ‘कोकणातील फायटर नेत्याचा पराभव केल्याचं आजही दुःख, राणेंना पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न’; दीपक केसरकर

एकनाथ शिंदे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करतील. परंतु फडवणीस करू देत नाही. अंतरावालीमध्ये महिलांवर हल्ला झाला. त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्यावर फडवणीस यांचा राग आहे. त्याचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात. त्यांना मला बदनाम करायचे आणि संपवायचे आहे. फडणवीस यांना कोणी पुढे गेलेले आवडत नाही. त्यांच्यामुळे पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहे. खडसे, पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले.

महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठे होऊ दिले नाही. बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. मी पायी तुझ्या कडे येत आहे, तुझ्या दारात येत आहे. माझा बळी घेऊन दाखवा. माझ्या उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. बारसकर, राणेंच्या मागून माझ्यावर हल्ला करु नका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button