TOP Newsताज्या घडामोडीपुणे

 गुंतवणूकदार देण्याच्या आमिषाने कंपनीलाच गंडा

गुंतवणूकदार देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित कंपनीला दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीड कोटींची ही रक्कम सेवा शुल्क म्हणून घेण्यात आली होती. मात्र, त्या बदल्यात कंपनीला कोणताही गुंतवणूकदार मिळवून देण्यात आला नाही. या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्र खांदवे (रा. सेनापती बापट रस्ता, पुणे) यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश ईश्वरलाल मेहता (वय ६१, रा. बाणेर, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार मेहता हे ओरा इनाेव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक असून आराेपी महेंद्र खांदवे हे एमआयएमएस ग्लाेबल लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. खांदवे यांनी मेहता यांच्या कंपनीत गुंतवणूकदार देताे असे सांगितले होते. त्यासाठी सेवा शुल्क म्हणून एकूण एक काेटी ८२ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांनी काेणतेही गुंतवणूकदार न दिल्याने तक्रारदारांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या पैशाची मागणी केली.

आराेपीने एक काेटी ८२ लाख रुपयांपैकी २९ लाख आठ हजार रुपये परत केले. परंतु, उर्वरित रक्कम वारंवार मागूनही त्याची परतफेड केली नाही. तसेच काेणताही गुंतवणूकदार न देता मेहता यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत चतुशृंगी पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक एस. काेळी पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button