breaking-newsमहाराष्ट्र

पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली

पनवेल : ऐन कोरोनाच्या संकटात राज्य शासनाने ( पनवेल मनपाचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महानगरपालिकेत बदली केली. नवीन आयुक्त सुधाकर देशमुख हे स्थिरस्थावर होत असतानाच नगर विकास विभागाने आणखी एक निर्णय घेतला आहे. पनवेल मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विरोधात लढा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत .

2016 साली पनवेल महानगरपालिका ची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत मनपाला अधिकाऱ्यांचा वाणवा आहे. तत्कालीन उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्या बदलीनंतर त्याच पदावर दुसरा अधिकारी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यानंतर पनवेल महानगरपालिका डॉ. प्रशांत रसाळ यांच्या रुपाने अतिरिक्त आयुक्त मिळाले. त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात अतिशय चांगले काम केले. घनकचरा व्यवस्थापनाची घडी त्यांनी बसवली. प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेत त्यांनी काम केले. शांत संयमी आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

पनवेलमध्ये कोरोना संकटात त्यांनी गेली तीन महिने समाधानकारक काम केलं. त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या सांभाळल्या. त्यांच्या अनुभवाचा या वैश्विक संकटात पनवेल मनपाला काम करताना फायदा झाला.

दरम्यान, पनवेलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशावेळी राज्य सरकारने डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून बदली केली आहे. अंबरनाथ येथे कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने रसाळ यांची त्या ठिकाणी बदली केली आहे. पनवेलचा पूर्ण अभ्यास असलेल्या या अधिकाऱ्याच्या बदलीने काहीशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button