breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

जिममध्ये वर्क आऊटनंतर ‘या’ तीन चुका कधीच नका करू, शरीराचं होईल भयंकर नुकसान!

Health : जिममधील वर्क आऊटनंतर अनेकजण काही अशा चुका करतात ज्यामुळे तुमच्या शरीराचं भयंकर नुकसान होऊ शकतं. अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुमच्या हातून नकळतही होतात. नेमक्या कोणत्या चुका आहेत जाणून घ्या.

हार्ड वर्क आऊट केल्यानंतर अनेकजण बाहेर पडतात. तर काहीजण लगेच आराम करत आपल्या डाईट प्लॅननुसार आहार घेतात. मात्र असं न करत वर्क आऊट झाल्यावर स्ट्रेचिंगही करायला हवं. स्ट्रेचिंगचा कंटाळा करू नका, नाहीतर मसलही लवकर गेन होणार नाहीत आणि वेदना जास्त जाणवतील.

वर्क आऊट झाल्यावर भूक लागलेली असते. परंतु वर्क आऊट करून झाल्यावर लगेचंच काही खाण्याची चूक करू नका. व्यायाम झाल्यावर कमीत कमी अर्ध्या तासानंतर खावं. शरीर थंड झाल्यावर शरीरात अन्न गेल्यावर प्रक्रिया सुरळीत होते.

हेही वाचा – अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणार मेड इन महाबळेश्वर गिफ्ट्स!

वर्क आऊट करताना फोन हातात घेत गाणी लावणे किंवा मेसेजला रिप्लाय देणे टाळावं. कारण याचा थेट परिणाम तुमच्या हार्मोन्सवर होत असतो. अशाने तुमचा तणाव वाढू शकतो.

वर्क आऊट करताना शरीरातून घाम निघतो. काहींचे सर्व कपडे भिजून जातात. तुम्ही जर हेच कपडे नंतर वापरत असाल तर अंगाला खाज सुटू शकते.

वर्क आऊट करणाऱ्यांनी गोड जितकं टाळता येईल ते टाळण्याचा प्रयत्न करावा. वर्क आऊट झाल्यावर बाजारामधील ऐनर्जी ड्रिंक प्यायले नाही पाहिजेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button