breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Ratan Tata Birthday : रतन टाटा यांच्या संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या..

Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. हे नाव म्हणजे टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. वयाचा आकडा वाढला असला तरीही या माणसाच्या मनाचं तारूण्य मात्र आजही १६ वर्षांच्या मुलाला लाजवेल असं आहे.

रतन टाटा ज्या टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्या टाटा ग्रुपच्या अंतर्गत १०० हून अधिक वेगवेगळ्या कंपन्या अस्तित्वात आहेत. या कंपन्या जगभरातील सहा खंडांमध्ये पसरलेल्या आहेत. भारतामधील वाहनक्षेत्रामध्ये क्रांती आणणाऱ्या आणि जागतिक स्तरावर वाहन उद्योगामध्ये भारताचे नाव सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या मोजक्या भारतीय उद्योजकांमध्ये रतन टाटा यांचा समावेश होतो. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रतन टाटा यांच्याकडे असणाऱ्या एकूण संपत्तीची रक्कम सुमारे ३५०० कोटी रूपये इतकी आहे. देशातील ४३३ वे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

हेही वाचा   –  लोकसभा निवडणूक लढवणार? माधुरी दीक्षितने सोडलं मौन, म्हणाली..

इतकी वर्षे उल्लेखनीय कामगिरी करूनही आणि उद्योग क्षेत्रात अनेक विभागांत सक्रिय असूनही टाटा यांची संपत्ती इतकी कमी कशी? हाच प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तर, समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे जाणत टाटा यांनी अनेक समाजोपयोगी कामांमध्ये हातभार लावला, मोठ्या प्रमाणात दान केलं. अनेक धर्मदाय संस्थांना आर्थिक पाठबळ देत रतन टाटा यांनी एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती जपली आणि हीच श्रीमंती त्यांना सर्वांच्या पुढे ठेवते असं म्हणायला हरकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button