breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

लोकसभा निवडणूक लढवणार? माधुरी दीक्षितने सोडलं मौन, म्हणाली..

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार अशीही चर्चा सुरू आहे. यावरून, स्वत: माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी भाष्य केलं आहे.

माधुरी दीक्षितच्या राजकारण प्रवेशनावर पती श्रीराम नेने म्हणाले, रोल मॉडेल हे समाजाला दिशा दाखवत असतात. समाजात चांगल्या सुधारणा झाल्या तर भारत पहिल्या क्रमांकावर येईल. राजकारण हा आमचा पिंड नाही. आम्ही रोज नव्या नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आम्हाला लोकांना मदत करायलाही आवडते.

हेही वाचा  –  ‘एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत..’; बच्चू कडूंचं सूचक विधान 

माधुरी दीक्षित म्हणाली, प्रत्येक निवडणूक आली की मला उत्तर द्यावं लागतं. पण निवडणूक लढवावी ही माझी महत्त्वाकांक्षा नाही. राजकारण हे माझं पॅशन नाही मी एक सर्जनशील व्यक्ती आहे. निवडणूक लढवणं ही माझी बकेटलिस्ट नाही, तर ती इतरांची आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मला कुठूनतरी उभं केलं जातं. मात्र मला राजकारणात काही रस नाही, असं माधुरीने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button