breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयआरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्र

आनंददायी ! कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; देशात 6 हजार 809 नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली । महान्यूज। विशेष प्रतिनिधी ।

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार राज्यभरात सर्वत्र लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. अशातच दिलासादायक बाब म्हणजे आज देशभरातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार राज्यभरात सर्वत्र लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. अशातच दिलासादायक बाब म्हणजे आज देशभरातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. सध्या देशात 55 हजार 114 कोरोनाबाधित उपचाराधीन आहेत.  

शनिवारी दिवसभरात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.12 टक्के इतकं घसरलं आहे. त्याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 98.69 टक्के झालं आहे. त्याआधी शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेत 410 रुग्णांची घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली आहे. तसेच, आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 38 लाख 73 हजार 430 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तर शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 19 लाख 35 हजार 814 डोस देण्यात आले आहेत. लसीकरणात आतापर्यंत 213 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 272 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, शनिवारी दिवसभरात एकूण 1771 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 1771 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 46 हजार 694 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्के एवढे झाले आहे. मुंबईत 394 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 623 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11 लाख 23 हजार 001 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 707 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button