breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

होळी, धूलिवंदन, रंगपंचमी मध्ये नेमका काय फरक असतो?

Holi 2024 | होळीचा सण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे होळी म्हणजे रंग असे समीकरण आहे. शहरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. पण होळीनंतर ४ ते ५ दिवसांनी रंगपंचमी येते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, होळी, धुळवड आणि धूलिवंदन यात नेमका काय फरक आहे?

होळी : 

होळीच्या दिवशी होळी पेटवून तिची पूजा करून पेटवली जाते. यादिवशी होळीला अनेक ठिकाणी खास पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळी रचण्याची धामधूम ३ ते ४ दिवस आधीच सुरु असते.

हेही वाचा     –     लोकसभा निवडणूक रणसंग्राम : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला! 

धूलिवंदन : 

धूलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी होळीची कर. या दिवशी होळी जाळून उरलेली राख एकमेकांवर उधळली जाते, यामुळे याला धुलिवंदन असं म्हणतात.

रंगपंचमी :

रंगपंचमी म्हणजे होळी नंतर पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. यादिवशी सामाजिक सलोखा जपत एकमेकांवर विविध रंगांची उधळण केली जाते. सर्वत्र कोरडे रंग, ओले रंग आणि पाणी देखील खेळले जाते. या दिवशी होळीच्या सणाची सांगता होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button