breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वाढदिवशी जितेंद्र आव्हाड माफी मागत अज्ञातस्थळी, फोनही बंद

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. परंतु ते अज्ञातस्थळी गेले आहेत. त्याचबरोबर त्यांचा फोनही बंद आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, उद्या ५ ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत ५ तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही, असं जितेंद्र अव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘काही लोक मिशी आणि दाढीवर बोट फिरवत उसने अवसान आणतात, पण..’; सामनातून संभाजी भिंडेवर हल्लाबोल

तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे, असं जितेंद्र अव्हाड यांनी म्हटलं आहे.

लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही जितेंद्र अव्हाड यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button