breaking-newsपिंपरी / चिंचवड

बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

पिंपरी : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोथुर्णे गावात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. संवेदनशील खटल्याची जलदगतीने सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे फाशीची सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची आई सुजाता महिपती दळवी, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, ता. वडगाव मावळ, जि.पुणे) हिला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याबाबत बालिकेच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. नागपंचमी निमित्त शाळेला सुटी असल्याने बालिका घरासमोर खेळत होती. घरासमोर खेळणारी बालिका बेपत्ता झाल्यानंतर गावात खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कामशेत पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. ३ ऑगस्ट रोजी दुपारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील दाट झाडीत बालिकेचा मृतदेह सापडला. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर गावात घबराट उडाली. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत बालिकेच्या घराशेजारी राहणारा आरोपी तेजस दळवीला अटक केली.

हेही वाचा –  लोकसभा निवडणूक रणसंग्राम : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या घराची पाहणी करण्यात आली. खाटेवर आणि न्हाणीघरातील फरशी आणि बादलीवर रक्ताचे डाग आढळून आले. आरोपीने वापरलेला चाकू, बालिकेचे कपडे, तिच्या कानातील रिंग आढळून आली. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २९ साक्षीदारांची साक्ष नोंंदविण्यात आली. बालिकेला आरोपीसोबत गावातील एका महिलेने पाहिले होते. शवविच्छेदन अहवाल, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित असलेल्या सरकारी पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली.

आरोपीने वासना शमविण्यासाठी बालिकेवर बलात्कार करुन तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. कठोर शिक्षेसाठी त्यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचे दाखले दिले. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (एबी) तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ॲड. कावेडिया यांनी केली. बचाव पक्षाकडून ॲड.यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button