breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

हमासचे हल्ले परतवून लावणारी इस्त्रायलची ‘आयर्न डोम’ यंत्रणा काय आहे?

Iron Dome : सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधला (israel and palestine war) वाद चांगलाच चिघळलेला पाहायला मिळतोय. दोन्ही देशांत सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे. अजूनही मृतांचा आकडा वाढतानाच दिसून येत आहे. या युद्धात आपण एक नाव कायमच ऐकतोय ते म्हणजे आयर्न डोम. आयर्न डोम ही इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. आयर्न डोम (Iron Dome) ही सुरक्षा यंत्रणेमध्ये शत्रूंची क्षेपणास्त्र तसेच रॉकेट्स हवेतच निष्क्रिय करण्याची क्षमता आहे. आता या दोन्ही देशात युद्ध सुरू असून हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्त्रायल मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले जात आहेत. हे हल्ले परतवून लावण्यात इस्त्रायलच्या यंत्रणेला यश आल्याचं पाहायला मिळतंय. यातील काही रॉकेट्स लोकवस्तीत देखील कोसळली असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत या युद्धात जवळपास १ हजारच्या वर लोकांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले आहे.

इस्रायलची आयर्न डोम ही एक प्रकारची क्षेपणास्त्र यंत्रणा आहे, जी जमिनीवर ठेवली जाते आणि शत्रूने समोरून एखादे क्षेपणास्त्र सोडले की ते त्यांच्या रडार यंत्रणेत दिसल्यावर या यंत्रणेतून रॉकेट्स हवेत सोडले जातात. यातून सोडली जाणारी रॉकेट्स शत्रूकडून होणार संभाव्य हल्ला रोखण्यास सक्षम आहे. इस्त्रायलच्या आसपास बहुतांश प्रमाणात अरब देश आहेत. यांच्यासोबत असलेला वाद आणि त्यांच्यापासून देशाला असलेला धोका लक्षात घेता इस्त्रायलने देशभरात आयर्न डोम ही यंत्रणा स्थापित केली आहे. ही आयर्न डोम यंत्रणा तब्बल ७० किलोमीटरपासून होणारा हल्ला परतवून लावू शकते. एवढी सगळी दक्षता घेऊन अजूनही हमास ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ला करण्यात यशस्वी होत आहे. त्यामुळे परिणामी इस्रायलवर चिंताजनक परीस्थिती ओढवली आहे.

हेही वाचा – ‘अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही’; शरद पवार यांचं सूचक विधान

मागील वर्षी मे महिन्यात देखील हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलवर हल्ले केले होते. एका मशिदीत झालेल्या वादानंतर येथे युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर आता पुन्हा हे युद्ध सुरू झाले आहे. या युद्धात हमासचे दहशतवादी रॉकेटपेक्षा ड्रोन्स आणि ग्लायडरचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. कारण आयर्न डोम हे ड्रोन्स आणि ग्लायडरचे हाले परतवून लावू शकत नाही. ग्लायडर आणि ड्रॉ कमी उंचीवरून हल्ले करत असल्याने याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. याच्या माध्यमातून केलेले हल्ले आयर्न डोम थोपवू शकत नसल्याने हमास नेहमीच हा पॅटर्न वापरताना दिसून येत आहे. पहिले रॉकेट्स डागून सुरक्षा यंत्रणेचे लक्ष तिकडे वेधायचे आणि नंतर ग्लायडरने दहशतवादी शहरात उतरवून घुसखोरी करायची. असा पॅटर्न हमासने वापरल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button