breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही’; शरद पवार यांचं सूचक विधान

मुंबई : अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाणार असल्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता. हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

हेही वाचा – पुण्यातील World cup सामने पाहण्यासाठी PMPML ने केले विशेष बसचे नियोजन!

भाजपसोबत जाण्याचा काही लोकांचा आग्रह होता. ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा प्रस्ताव होता. आमचा तो प्रस्ताव नव्हताच. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची जी स्टेप होती ती मान्य नव्हती. भुजबळ यांनीच आपण खोटं बोलून शपथविधीला गेल्याचं कबुल केल्याचंही त्यांनी सांगितलं, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची जबाबदारी आमची नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांची आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना ज्यांनी त्यांना शब्द दिला ते काय करतात ते पाहू, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button