breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: सांगवीमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या निमित्ताने नागरिकांची गर्दी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे. नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे वारंवार प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र, तरीही काही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत.

सांगवीमधील आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धक्कादायक चित्र दिसले. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांनी परिसरात गर्दी केली.

याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ‘‘लोकांना समजत नाही.  हा लाॅकडाऊन कशासाठी आणि कोणासाठी केला आहे ? सरकारनी गंमत म्हणून लाॅकडाऊन केला आहे काय? कधी सुधारणार काय माहित आपण. अरे तुम्हाला तुमच्या जिवाची काळजी नाही तर नसु द्या. पण तुमच्या मुळे अनेक पोलिस बांधव आपले घरदार सोडून रस्त्यावर आहेत.   वैद्यकीय कर्मचारी घरापासून लांब राहत रुग्णांची सेवा करतात त्यांना तरी त्रास देऊ नका ? ते सरकार आपल्यासाठी एवढा मोठा महसुल बुडवत लाॅकडाऊन जाहिर करत आहे त्याला तरी सहकार्य करा? एक तर परिस्थिती गंभीर निर्माण होत आहे.  त्याचे तरी भान ठेवा.

 सरकारने दुध , भाजीपाला,  किराणा बंद ठेवल्याशिवाय त्याशिवाय ह्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजणार नाही..असा संताप नेटिझन्स व्यक्त करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button