breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास फोर्स मोटर्स कंपनीचा एक हात मदतीचा!

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास प्रतिसाद देत फोर्स मोटर्स कंपनीने  टाकवे बु, कान्हे, जांभुळ, कामशेत परिसरातील ५०० गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. आमदार सुनिल शेळके यांनी फोर्स कंपनीचे व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत टाकवे बु परिसरातील ५०० गरजू कुटुंबाना आमदार सुनील शेळके व फोर्स कंपनीच्या सहकार्याने महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.

टाकवे बु परिसरात औद्योगिक वसाहत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्या बंद असल्याने येथील आसपासच्या भागात राहणाऱ्या कामगारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून औद्योगिक वसाहतीतील कामगारांना प्रथम प्राधान्य देत हे जीवनावश्यक कीट  देण्यास प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करुन हे वाटप करण्यात आले.

    ‘आमदार सुनिलआण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकवे आणि परिसरातील गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमदारांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील कुठलीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही या भागात घेऊ’ असे सरपंच सुप्रिया मालपोटे यांनी सांगितले.

यावेळी फोर्स मोटरचे मॅनेजर देवेंद्र पाटील, सरपंच सुप्रिया मालपोटे, तलाठी मलबारी मॅडम, ग्रामसेवक एस. बी. बांगर, पो पाटील अतुल असवले, उपसरपंच रोहीदास असवले,अविनाश असवले, उद्योजक भरत सातकर, अनिल मालपोटे, गोरख मालपोटे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष शिवाजी असवले, चंद्रकांत असवले, अनिल असवले, अजिंक्य असवले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button