breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘पुण्यात हवेतून चालणारी बस आणण्याचा प्रयत्न’; नितीन गडकरींचं मोठं विधान

पुणे : चांदणी चौकातील पुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी पुण्यात हवेतून चालणारी बस आणण्याचा प्रयत्न आहे, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करणार आहे.

हेही वाचा – शिवाजीनगर-हिंजवडी-माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

पुण्यात काही ठिकाणी हवेतून चालणारी स्काय बस (डबल–डेकर रेल्वे)आणण्याचा प्रयत्न असणार आहे. हवेतून चालणाऱ्या स्काय बसमध्ये अडीचशे लोक बसतात. अजित दादा आणि चंद्रकांत दादा यांनी स्काय बसची मांडणी एकदा पाहावी आणि त्याचा अभ्यास करावा. कारण, पुण्यातील रस्त्यांचे रूंदीकरण होऊ शकणार नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button