breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Waragainstcorona: राज्यातील ऊसतोड कामगरांना स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ! (व्‍हीडिओ)

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान, ऊसतोड कामगारांप्रति सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंडे यांनी आभार मानले आहेत. तसेच घरी परतताना ऊसतोड मजूरांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून घरी परतावे, प्रशासनाला सहकार्य करावे, महिला व लहान बालकांना प्राधान्य द्यावे व सुखरुप घरी परतावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.

पहा व्‍हीडिओ…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button