breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या सगळ्या निवडणुका एकत्र लढणार : खासदार संजय राऊत

पुणे |

स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात मविआत एकमत – संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो प्रयोग आहे, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत आहे.

  • केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत द्वेष आणि सूडभावनेने वागली – संजय राऊत

महाविकास आघाडी सरकार अडीच महिनेही टीकणार नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल, अशा प्रकारचं विरोधकांचं मत होतं. देव पाण्याच घालून बसले होते. तारखांवर तारखा देत राहिले. कोणीतरी १ जून ही शेवटची तारीख दिलीये. यासर्व परिस्थीतीत आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांपासून केंद्र सरकार द्वेष आणि सूडभावनेने वागत राहिली.

महाराष्ट्राशी वैरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत येऊ शकलं नाही या सूडापोटी महाराष्ट्राला कोणतंही सहकार्य करायचं नाही, संकटावर संकट टाकायची. या परिस्थितीची सामना मविआने फार ताकदीने केलाय.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button