breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने बंद, डॉक्टरही गायब, रुग्णांची गैरसोय

नागरिकांना खरी गरज आहे. त्याचवेळी दवाखाने बंद करून गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम केली आहे.

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले असून त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातून रुग्णालये, दवाखाने यांसारख्या जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले असले तरी पिंपरी चिंचवड शहरात मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश लहान मोठे खासगी दवाखाने चक्क बंद करण्यात आले असून डॉक्टरही गायब झाले आहेत. परिणामी आधीच कोरोनामुळे घाबरलेले नागरिक दवाखाने बंद असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयात मोठी गर्दी करत आहेत.

परिणामी सर्दी-खोकल्यासारख्या किंवा इतर छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जावं लागतं आहे. तर आधीच शासकीय रुग्णालयात कोरोनामूळे तपासणीसाठी लोकांची मोठी गर्दी झालेली असताना त्याठिकाणी जाण्यासाठी नागरिक काहीसे घाबरत आहेत. मात्र पर्याय म्हणून नागरिकांना हा मार्ग निवडावा लागत आहे. तर दवाखाने बंद ठेवल्याने इतर रुग्णालयावर येणारा ताण पाहता ज्यावेळी नागरिकांना खरी गरज आहे. त्याचवेळी हे दवाखाने बंद करून गेलेल्या डॉक्टरांवर कारवाईची करण्यात यावी अशी मागणी सतीश कदम केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button