breaking-newsपिंपरी / चिंचवड

ऑटो क्लस्टर कोविड 19 हॉस्पिटल व मगर स्टेडीयम येथील जम्बो रुग्णालयाची पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या आय.सी.यु., ऑक्सीजन व कोविड 19 हॉस्पिटल आणि आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो रुग्णालयाची आज महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी पाहणी केली.

या पाहणीनंतर ऑटो क्लस्टर या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली असुन ऑक्सिजन आवश्यक असलेल्या १२ रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नोडल अधिकारी सुनिल अलमलेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांसाठी वेळीच ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे ५० आय.सी.यु व १५० ऑक्सीजन बेडचे कोविड 19 हॉस्पिटल व महाराष्ट्र शासनाकडुन आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे 816 बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयांची आज महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांनी पाहणी केली.

या प्रसंगी पुणे येथील झालेली घटना विचारात घेवुन येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत व रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा होणार नाही तसेच रुग्णांची हेळसांड होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर गोळ्या, औषध, लॅब, ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबतचे सक्त आदेश संबधित ॲडमिस्ट्रेशन व अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे नोडल अधिकारी सुनिल अलमलेकर यांना महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी दिले. तसेच कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देण्याचे कामही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी करावे अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या. तत्पुर्वी सातारा जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कोल्हापुर व कोल्हापुर महापालिका आयुक्त यांनी ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलची पाहणी करुन नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button