breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदारांचा नगरसेवकांशी ‘ऑडिओ कॉन्फरन्स’द्वारे संवाद; सतर्कतेच्या सूचना!

– शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतला आढावा

– कोरोना विषाणु विरुद्धच्या लढाईत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडवर आलेले कोरोनारुपी संकट दूर करण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करुया…कोरोनाला हद्दपार करुया…असा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी केला आहे. तसेच, आगामी काही दिवस प्रभागातील नागरिकांना घराबाहेर पडू न देत मदतकार्य चालू ठेवण्यात येणार आहे.

          भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी ‘ऑडिओ कॉन्फरन्स’द्वारे पक्षाच्या सर्व नगरसेवकांशी संवाद  साधला. यावेळी प्रभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या कॉन्फरन्समध्ये पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, तसेच विजय फुगे, राजु दुर्गे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

          आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना म्हटले की, आपआपल्या प्रभागात सर्वांनी लक्ष द्यावे. प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले पाहिजे. भाजी मंडईबाबतचा आपला उद्देश लोकांना समाजवून सांगा. सोशल डिस्टंसिंगबाबत प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. तसेच, महापौर माई ढोरे यांनी सुरू केला अन्नधान्य वाटप उपक्रमाचा लाभ आपल्या प्रभागातील प्रत्येक गरजु व्यक्तीला झाला पाहिजे, याची नगरसेवकांनी काळजी घ्यावी. काही नागरिक आजारी आहेत. मात्र, कोरोना चाचणी करण्याबाबत घाबरत आहेत, अशा नागरिकांनी न घाबरता चाचणी करुन घ्यावी, याबाबत प्रभागात प्रबोधन करावे. विशेष म्हणजे, नगरसेवकांनी आपली स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी संवादात म्हटले.

          शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, नगरसेवकांनी प्रथम आपली स्वत:ची काळजी घ्या. रेशनिंगवर मिळाणारे धान्य लोकांना व्यवस्थित मिळाले पाहिजे, याबाबत प्रभागात लक्ष ठेवा. भाजी मंडई सुरु करण्याचा उद्देश काय आहे? हे सर्वांनी लक्षात घ्या. शहरातील नागरी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे. प्रत्येक नगरसेवक आपआपल्या परीने चांगले काम करीत आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. सध्या शहरात ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील ३ हजार ४९५ नागरिकांना होमक्वारंटाईन केले आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही लांडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button