breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लॉकडाऊनमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचे महाराष्ट्रात 133 गुन्हे दाखल

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात बाल अश्लीलतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसात चाईल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन शोध आणि आशयाचा प्रसार यासंबंधी 133 गुन्हे दाखल आहेत. तसेच 46 लोकांना अटक केली आहे. आपल्या राज्यासाठी ही अत्यंत लाजीवरवाणी बाब आहे. गृह मंत्रालयाच्या मते, इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंडच्या निदर्शनास आले की, गेल्या एक महिन्यात ‘चाइल्ड पॉर्न’, ‘सेक्सी चाइल्ड’ आणि ‘टीन सेक्स व्हिडिओ’ अशा शब्दांसाठी ऑनलाईन शोध वाढले आहेत. देशातील बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

नोबेल पारितोषिक विजेता कैलाश सत्यार्थी यांचा मुलगा भुवन रिभू यांनी यावर्षी जानेवारीत या संस्थेची सुरूवात केली होती. गृहमंत्र्यांनी सायबर सेलला ऑपरेशन वेगवान करण्याचे आदेश दिले. जानेवारीपासून महाराष्ट्रातील चाईल्ड पोर्नोग्राफरला अटक करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकफेस चालविण्यात आलं होतं. ज्याचं परीक्षण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. अनिल देशमुख यांनी चाईल्ड पोर्न सर्चला जास्त मागणी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलला दुप्पट प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button