breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : महापालिकेकडून शहरातील झोपडपट्टी भागाची कसून तपासणी होणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

“कोरोना” COVID – 19 विषाणूचा पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात होणारा प्रसार ऱोखण्यासाठी करावयाच्या कार्यवाही संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे समवेत त्यांचे दालनात आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समवेत बैठक झाली.

त्या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर हे औद्यागिक नगरी असुन येथे बहुतांश कामगार वर्ग परप्रांतीय नागरिक वास्तव्य करीत आहे. सद्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व कारखाने बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येवु नये यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ ३०००० लोकांना सकस जेवण देण्याची व्यवस्था करणेबाबत सुचना देण्यात आल्या. यासाठी तातडीने लागणाऱ्या सर्व खर्चासाठी यापुर्वीच स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे.

क्षेत्रिय कार्यालयातंर्गत प्रभाग स्तरावर कोरोना COVID – 19 ला रोखण्यासाठी तत्पर पथके तयार करावीत त्यामध्ये कमीत कमी १० कर्मचारी असतील अशी व्यवस्था तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातुन कोरोना COVID – 19 संदर्भातील माहिती घेवुन सर्व अडचणी सोडवणेत याव्यात. तसेच या पथकांच्या माध्यमातुन त्या त्या भागात टेम्प्रेंचर गनद्वारे झोपडपट्टी भागाची तपासणी करणेत यावी. त्याचबरोबर झोपडपट्टी भागात साबण व मास्कचे वाटप करावे. तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करुन त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत. जेणेकरुन कोरोना संदर्भातील कामांचा जागेवरच निपटारा होण्यास सुलभता येईल. त्याचबरोबर शहरातील किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, सफाई कर्मचारी, रेशनिंग दुकानदार व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींशी जादा संपर्क असणाऱ्यांची तपासणी या पथकाद्वारे करणेत यावी.

ज्या क्षेत्रामध्ये “कोरोना” COVID – 19 चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येतील तो परिसर तातडीने कमीत कमी वेळेत सील करुन त्या भागातील तपासणी तातडीने चालू करावी. तसेच महापालिकेच्या दवाखान्यामध्ये जे डॉक्टर, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन काम करीत आहेत त्यांना कामाचा जादा मोबदला म्हणजे दुप्पट वेतन द्यावे. इतर आजारांसाठी खाजगी रुग्णालयासोबत चर्चा करुन कोरोना व्यतिरिक्त रुग्णासांठी मनपा रुग्णालयाप्रमाणे अल्प दरात OPD उपलब्ध करून त्या घोषित कराव्यात जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच कोरोनाची प्रार्श्वभूमी लक्षात घेता डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशियन, वार्ड बॉय यांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरती करावी प्रसंगी त्यांच्यासुध्दा मानधनात वाढ करावी. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीत महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेता नामदेव ढाके, स्थायी समिती चेअरमन संतोष लोंढे, माजी सभागृह नेता एकनाथ पवार, माजी स्थायी समिती चेअरमन विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त (१) संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त (२) अजित पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे व मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे इ. उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button