breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा चौथा बळी; निगडी ओटास्किममधील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शहरातील निगडी ओटास्कीम भागातील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील पण वायसीएमध्ये मृत्यू झालेल्या एका महिलेचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्कीम येथील 65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहचली आहे. दरम्यान, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि.20) निगडी भागातील रहिवाशी पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा रविवारी (दि.20) एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, आज शुक्रवारी (दि. 24) एप्रिल निगडीतील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह
रुपीनगर, कोयनानगर भागातील 11 जणांचे आज (शुक्रवारी) सकाळी कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये 18,22, 24, 26, 28, 35 आणि 60 वयवर्ष असलेल्या सात पुरुषांचा समावेश आहे. तर, तीन वर्षाच्या दोन चिमुकल्या, 20, 26 आणि 28 वयवर्ष असलेल्या अशा पाच महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, गुरुवारी रात्री पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button