breaking-newsTOP Newsमनोरंजनमुंबईराजकारणराष्ट्रिय

अक्षय कुमारच्या पोस्टवर आव्हाडांचा संताप, मराठी माणसाला येड्यात काढता का?

ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून आता अक्षयचा फस्ट लूक समोर आला आहे. मात्र अक्षय कुमारचा लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांकडून सिनेमाला मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं जात आहे. एखाद्या मराठी कलाकाराने ही भूमिका साकारला हवी होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर जे तेज होते ते अक्षयच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही म्हणत चाहते ट्रोल करत आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टीका केली आहे. आव्हाडांनी या चित्रपटाबाबत ट्विट करत टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट छत्रपती शिवाजी महाराजांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तीन फोटो पोस्ट करत आव्हाड म्हणाले की, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमावर टीका केली. त्यांनी असे लिहिले आहे की, ‘जर्मनी, पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं असं वाटतं. आव्हाडांनी या ट्विटमध्ये अक्षय कुमारचे नाव न घेता त्याच्या लूकवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button