breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: कोकण-खेड युवाशक्तीतर्फे गरजु कुटुंबीयांना अन्नधान्याचे वाटप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोकण-खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड शहरात रोजगारासाठी आलेल्या परंतु ज्यांची परिस्थिती गरीब आहे.अशा गरजु पन्नास कुटुंबीयांना युवाशक्तीकडुन किराणा वाटप करण्यात आले.

      परंतु हे कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ काढुव त्याची सोशल मिडियावर पोस्टरबाजी न करता गरजुंना मदत केली.त्यांची कोठेही सोशल मिडियावर वाच्यता करण्यात येत नाही.अपण ज्या समाजात राहतो त्या सनाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच भावनेतुन मंडळातील काही कार्यकर्त्यांनी आपआपल्या परिसरातील गरजु,गरीब कुटुंबीयांसाठी पंधरा ते वीस दिवस पुरेल इतके किराणा देण्याची व्यवस्था घरपोच  केली.आपण केलेली मदत ही मदत नसुन अडचणीत सापडलेल्यांना सहकार्य करणे ही आपली संस्कृती आहे असे,मंडळातील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.कोठेही गर्दी,गोंधळ न करता सोशल डिन्सिंगचे नियम पाळत हे कर्तव्य युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी केली.असेच कार्य करणे आज गरजेचे आहे.नाही तर करणी चार आण्याची आणि गाजवाजा बाराण्याचा असेच आज चिञ दिसुन येत आहे.अडचणीच्य व काळात मदत करणे व त्यांची कोठेही वाच्यता न करणे यांत खरे दानाचे महत्त्व लपलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button