breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#PCMC: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे ‘गिरे तो भी टांग उपर’ : विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे नेते (शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप) शासकीय योजनांमधून मिळणारे धान्य वाटप करुन स्वत:ची चमकोगिरी करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर राज्य शासनाने रेशन धान्यवाटपात राजकीय हस्तक्षेप नको, असा आदेश दिला आहे. असे असतानाही भाजपाचे नेते ‘गिरे तो भी टांग उपर’अशा आविर्भावात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली.

नाना काटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जगामध्ये व देशांमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने धुमाकूळ घातलेला असताना एका बाजूला अनेक लोक सामाजिक दृष्टिकोनातून अनेकांना सहकार्य मदत करताहेत पिंपरी-चिंचवड शहर सुद्धा याला अपवाद नाही. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे पदाधिकारी, नगरसदस्य नागरिकांना उपलब्ध होणारे सरकारी राशनचे धान्य स्वतःच्या संस्थांच्या व वैयक्तिक नावाने सांगून नागरिकांना फसवत आहेत हे या शहराचे दुर्दैव आहे. याबाबत आम्ही दिनांक १६/४/२०२० रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालक मंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली होती व  कोरोना च्या महाभयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा सरकारी योजनांवर स्वतःच्या नावाने चमकोगिरी… अशा आशयाची बातमी प्रसिध्दीस दिली होती.

  ‘त्या’ बातमीची  राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन शासनाने धान्य वाटपातील राजकीय हस्तक्षेप थांबविला आहे. राज्य शासनाने दखल घेतली म्हणजेच आम्ही प्रसिध्दीस दिलेले वृत खरे होते व त्यात शासनाच्या धान्य वाटपात  भाजपचे पदाधिकारी हस्तक्षेप करुन चमकोगिरी करीत होते हे सिध्द होते. यांच्याच मिरच्या  नामदेव ढाके यांना झोबल्या असून त्यांनी नाना काटे यांच्यामुळे फुकट धान्य वाटपाला खीळ अशा आशयाचे वृत प्रसिध्दीस दिले आहे. वस्तुत: शहरातील बेघर, बेरोजगार व अनाथ नागरीकांना  आम्ही शासकीय धान्य वाटपामध्ये (राशन वाटप) भाजपच्या स्थानिक आमदार व त्यांचे नगरसदस्य भाजप पक्षाच्या बोधचिन्हासह स्वत:ची नावे टाकून  आम्ही स्वखर्चांने धान्य वाटप करीत आहोत असे दाखवून स्वत:ची व भाजप पक्षाची कोरोना सारख्या महाभंयकर  महामारीमध्येही प्रसिध्दी करुन घेत होते. त्याचा भांडाफोड आम्ही सर्व पुरावे देऊन केलेला आहे. त्यामुळेच शासनाने राजकीय हस्तक्षेप थांबविला आहे. हे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते, नगरसदस्य यांनी आमचे नाव न घेण्याच्या अटीवर मला फोन करुन ही स्थगिती दिल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.  शहरातील बेघर, बेरोजगार व अनाथ नागरीकांना पूर्वीप्रमाणे किंबहुना राजकीय हस्तेक्षेप थांबविल्यामुळे शासन, मनपा व स्थानिक नगरसदस्य यांच्या योग्य समन्वयामुळे शहरातील प्रत्येक गरजू नागरीकांना राशन / जेवण व्यवस्थित पुरविले जात आहे.

 भाजपाच्या पदाधिका-यांच्या प्रसिध्दीचा भांडाफोड केल्यामुळे त्याचा तिळपापड झालेला आहे.  त्यामुळे आता काही तरी बोलायचे म्हणून नामदेव ढाके चुकीची वक्तव्ये करीत आहेत. अर्थात त्यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. त्यांच्या खाद्यांवर बंदूक ठेऊन दुसरेच निशाना साधत आहेत. हे त्यांनाही कळत नाही हे त्यांचे दुर्दैव. शासनाची मदत येणा अगोदरच आम्ही, राष्ट्रवादीचे नगरसदस्य, कार्यकर्ते व शहरातील सामाजिक संस्था यांनी शहरातील गरजू नागरीकांना स्वखर्चाने मदत केली आहे, करत आहे एवढेच या निमित्ताने सांगू इच्छितो, असेही नाना काटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button