breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल (२९ सप्टेंबर) सकाळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे नाही आहेत. तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी उषा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना देखील स्वविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.