breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : महापालिका स्तरावर नागरिकांना दिलासा; मिळकतकरामध्ये सवलत

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (COVID – 19) जगभरात पसरलेल्या साथीचा आजार म्हणून घोषित केला असून सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगिक तसेच कामगार नगरी आहे.  नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत.  शहरातील नागरिकांना महापालिका स्तरावरून दिलासा देणेच्या दृष्टीने मिळकत करामध्ये खालील सवलत देण्यात येत आहे.

दिनांक 01/04/2020 ते 31/05/2020 अखेर थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रक्कमी 100% रक्कम भरलेनंतर भरणा दिनांकापर्यंत आकारणेत आलेल्या मनपाकराचे विलंब दंड रक्कमेचे 90%  सवलत देण्यात येणार आहे.

दिनांक 01/04/2020 ते 31/03/2021 अखेर सन 2020-2021 चे चालू मिळकतकरावर अनुसूची ड प्रकरण 8 नियम 51 अन्वये देय असणारी शास्ती फी (मनपा शास्ती कर ) पूर्ण माफ करणेत येईल.

दिनांक 01/04/2020 ते 30/06/2020 या कालावधीत मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांना सन 2019-2020 मधील कर व करेत्तर बाबींचे दरपत्रकामध्ये नमूद  मुद्दा क्रमांक 14 नुसार सामान्य करतील सवलत योजनेनुसार लागू राहील.

                      तसेच ज्या माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी /  फक्त महिलांचे नावे असलेल्या /  40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणा-या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणा-या मिळकतीस तसेच संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा तसेच अविवाहीत शहीद सैनिकांचे नामनिर्देशितांचे मालमत्तांना मागील वर्षी सवलतींचा लाभ दिला आहे, त्यांचेकडून लॉकडाऊन कालावधी संपलेनंतर संबंधितांचा प्राप्त होणा-या अर्जाच्या अधीन राहून त्यांना चालू वर्षाकरिता संगणक प्रणालीमध्ये सवलतीचा फ्लॅग जनरेट करुन सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

                      त्याचप्रमाणे सन २०२०-२१ करीता महापालिकेने केलेली करवाढ करु नये अशी सुचना मा. आयुक्तांना केली आहे.

                      लॉकडाऊनचे कालावधीमध्ये विभागीय कार्यालयाकडील कॅश काऊंटर दिनांक 30/04/2020 पर्यंत बंद ठेऊन मिळकतधारकांना महापालिकेचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरुन मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणेची सुविधेचा वापर करावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते मा. नामदेव ढाके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button